Breaking News
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात ; एकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
उरण ः उरण तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यातच अपघात होऊन वाढणारी मृत्युची संख्या चिंताजनक आहे. बस चालकाचे आपल्या वाहणावरील नियंत्रण सुटल्याने जुईनगर येथून आलेल्या एन एम एम टी बसने खोपटा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर केशव ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन सदर चालकावर व संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली.
एनएमएमटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील बसने खोपटा-कोप्रोली रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि 8) सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. या अपघात पाच मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावले असले तरी दोन मोटारसायकल स्वारांना फडफडत नेल्याने झालेल्या अपघात निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे. तर केशव ठाकूर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर एन एम एम टी बस मधिल प्रवाशी नागरीकांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघाता मयत, जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली.
मात्र खोपटा चिरनेर कोप्रोली या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बॅरिगेट्स बसवावेत. योग्य ठिकाणी गतिरोधक हवेत. प्रत्येक कंपनीच्या सुरक्षाराक्षकांनी वाहने व्यवस्थित पास होतात की नाही याची काळजी घ्यावी. खोपटे कोप्रोली चिरनेर मार्गावर सुरक्षा रक्षक नेमावेत. वाहने येण्यासाठी व वाहने जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावा. रस्ता चार पदरी करावा.पोलीस प्रशासनातर्फे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवीणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी विविध मागणी ग्रामस्थांनी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संस्था संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai