Breaking News
नवी मुंबई ः ओरिएंटल महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी 533 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात 4 मे 2024 रोजी झाला होता. विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दीप प्रज्वलन, शास्त्रीय नृत्य सादरीकरण आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. दिवंगत प्रोफेसर जावेद खान यांनाही यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थी शपथविधीनंतर पदवी प्रदान करण्यात आली. ओरिएंटल कॉलेज ऑफ फार्मसी सानपाडा (ओसीपी)मधील एकूण 58 विद्यार्थी ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (ओआयएम) मधील 51 विद्यार्थी ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ (ओसीएल)चे 98 विद्यार्थी सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी ए (एस एस सी टी) मधील 287 विद्यार्थी आणि ओरिएंटल कॉलेज ऑफ एज्युकेशन मधील 39 विद्यार्थी यांना पदवी प्रदान करण्यात आली. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रमा झाला असून यशस्वी झालेल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai