Breaking News
नवी मुंबई ः पालिका शिक्षण विभागाच्या वतीने 4 जानेवारी, 2020 रोजी 4 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये 18 हजारहून अधिक खाजगी व महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला होता.
या स्पर्धेकरिता इयत्ता 5वी ते 7वी अशा पहिल्या गटासाठी 1) माझी शाळा - सुंदर शाळा, 2) माझा परिसर - स्वच्छ परिसर असे विषय देण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम - कु. पियुष प्रताप सोनवणे, व्दितीय - कु. तनेश सुभाष सुळ, तृतीय - कु. जान्हवी सचिन आगलावे, चतुर्थ - कु. रोहेम विश्वकर्मा, पाचवा - कु. ख्याती स्पीहा हजारीका तसेच उत्तेजनार्थ 1 - कु. अथर्व सचिन वास्कर, उत्तेजनार्थ 2 - कु. अनुराग राजेंद्र वर्मा, उत्तेजनार्थ 3- कु. प्रथमा दास, उत्तेजनार्थ 4- कु. संतु समीर बिस्वास, उत्तेजनार्थ 5- कु. नहा रवि चव्हाण त्याचप्रमाणे निखिल दिनेश कनौजिया याला व्दियांग विद्यार्थी विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे दुसर्या गटात 1) माझा कचरा माझी जबाबदारी, 2) स्वच्छ भारत अभियान माझा सहभाग, 3) कच-याचे वर्गीकरण व पुनर्वापर असे विषय देण्यात आलेले होते. त्यास अनुसरुन प्रथम - कु. साहील जाधव, व्दितीय - कु. श्रवण कासार, तृतीय - कु. खुशबु यादव, चतुर्थ - कु. वैष्णवी बालाधी, पाचवा - कु. परशुराम इंगोले तसेच उत्तेजनार्थ 1- कु. सानिका दुदुस्कर, उत्तेजनार्थ 2- कु. सार्थक शर्मा, उत्तेजनार्थ 3 - कु. लब्धी संमोई, उत्तेजनार्थ 4 - कु. विमला चौधरी, उत्तेजनार्थ 5 - कु. होलिका आईन्द त्याचप्रमाणे आश्विनी शेळके हिला व्दियांग विद्यार्थी विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धांचे परीक्षण जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्सचे माजी विभागप्रमुख डॉ. सुभाष पवार, कलाशिक्षक अनिल आचरेकर, कलाशिक्षक सुभाष मोरणकर यांनी केले. या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये गुणानुक्रमे प्रत्येकी पहिल्या 5 क्रमांकांना अनुक्रमे रु.11,000, 9,000, 7,000, 5,000 व 3,000 याप्रमाणे तसेच 5 चित्रकृतींना उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.1,000 असे पुरस्कार व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत. लवकरच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार असून विद्यार्थ्यांनी चितारलेल्या विविधांगी चित्रांतून त्यांच्या मनात खोल रुजलेला स्वच्छतेचा संदेश प्रदर्शित होत असल्याचे दिसून येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai