चेहेरा

मीरा के बोल
चेहर्‍यावरती अनेक चेहेरे,सुंदर कुरुप बरेच चेहेरे
या खोटया चेहर्‍याने पलीकडे, दिसले कधी खरे चेहेरे?
एक चेहेरा ओळखीचा, वाटुलागे सोबतीचा
तोच चेहेरा का मग, वर्षांनी भासे परक्याचा...
आयुष्य जसे सरत जाती,चेहेर्‍यांवर चेहेरे चढत जाती
ह्या असंख्य चेहेर्‍यामधला, खरा चेहेरा अलगद सारे विसरून जाती...
आकाशातल्या चेहर्‍यानेे दिला असता एक चेहरा
का मोह व्हावा लावण्यास त्यावर दूसरा खोटा चेहरा....
खर्‍या चेहर्‍याला का भासे गरज खोटया चेहर्‍याची
गरज एका वर भागत नसून होऊन बसते अनेक चेहर्‍यांची..
जीवनाच्या सांजेला मग ओझे वाटती ह्या चेहेर्‍यांचे
केविलवाणे होई मन, सोडताना गाठी ह्या चेहर्‍यांचे..
वैकुंठास जाताना मग इथले चेहेरे इथेच काढावे लागती
आकाशातल्या चेहर्‍याने दिलेल्या चेहर्‍यावर मग अंत्यसंस्कार घडती!!
 मीरा पितळे