आठवणी फक्त मागे उरती...
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 18, 2021
- 1682
माणसे येती माणसे जाती
आठवणी फक्त मागे उरती...
जगताना जी नकोसे वाटली
तीच जाताना निरोपाला येती,
माणसे येती माणसे जाती
आठवणी फक्त मागे उरती....
कोण आपला कोण परका
कोडे कठीण हे सगळेच सोडवती,
ऊत्तर ह्या कोड्याचे मात्र
डोळे मिटल्यावर समजुनी येती
माणसे येती माणसे जाती
आठवणी फक्त मागे उरती...
आयुष्याच्या मावळतीला जेव्हा
हिशोब सार्यांचा मांडती
नफा नुकसान ह्या पलीकडचे,
बरचं काही हाती लगती
माणसे येती माणसे जाती
आठवणी फक्त मागे उरती...
आठवणी ह्या भल्या बुर्या
लपंडाव मजशी खेळती
माणसे एक एक निसटताना,
आठवणी त्यांच्या छळत राहती
माणसे येती माणसे जाती
आठवणी फक्त मागे उरती...
का गुंतले मी ह्या पसार्यात
सत्य मृत्युचे मझं ठाऊक होते
का उगाच जीव जडला
विरह आपल्यांचे अटळच होते
मोह माया नाती गोती
हे शब्दांपुरती उरती
जीवनाच्या शेवटला
ह्यांचे ही पाश सुटती
माणसे येती माणसे जाती
आठवणी फक्त मागे उरती...
-मीरा पितळे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai