तुझं आणि माझं नातं तसं एका छत्रीत मावणारं गडगडुन कोसळणार्या पावसाला घट्ट मिठीत घेउन बिलगणार.. तुझं आणि माझं नातं तस एका चाद्रित समावणार गोड गुलाबी थंडीला उबदार कुशित ओढणार.. तुझं आणि माझं नातं तस एका घरात रमणार शुभ्र सफेद भिंतींना प्रेमाच्या रंगाने रंगवणार.. तुझं आणि माझं नातं तस एका भाकरीत सुखावणार अन्नाच्या प्रत्येेक घासात पोटभर ढेकर देणार.. तुझं आणि माझं नातं तस एका नजरेत समजणार आत खोलवर मुरलेलं एका धाग्यांत बंधणारं.. तुझं माझं नातं एका जन्मात न मावणारं अनेक जन्मांचं असलं तरी प्रत्येक क्षण जपणारं
मीरा पितळे
रिपोर्टर
Aajchi Navi Mumbai
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai