पालक गमावलेल्या बालकांच्या मदतीसाठी आवाहन

नवी मुंबई ः कोव्हीड-19 महामारीच्या कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या बालकांचे पालक मृत्यूमुखी पडलेले आहेत अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नाही अशा बालकांच्या मदतीसाठी महाराष्ट शासनाने जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना केलेली आहे. या बालकांना संपूर्ण संरक्षण, संगोपन कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे.

त्या अनुषंगाने अशी संकटामध्ये सापडलेली बालके आढळून आल्यास अथवा त्यांची माहिती मिळाल्यास सदर माहिती उपआयुक्त, समाजविकास विभाग, पालिका मुख्यालय कार्यालयात देण्यात यावी. (कार्यालय संपर्कध्वनी क्र,022-27567279) (इमेलआयडी- वाल_ीुवपाालेपश्रळपश.लेा) असे आवाहन पालिकेने केले आहे. जेणेकरुन संकलीत झालेली सर्व माहिती अशा बालकांच्या मदतीसाठी ठाणे जिल्हास्तरीय कृती दलाकडे पाठवून मदत मिळवून देणे शक्य होईल. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेव्दारे भविष्यात याविषयी उपाययोजना करणेसाठी सदर माहिती उपयुक्त ठरणार आहे.