मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 03, 2024
- 671
विधानसभा निवडणुक लढवण्याचे नाईकांचे संकेत
नवी मुंबई ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नवी मुंबईत महायुतीमध्ये असणारी धुसफुस या ना त्या कारणाने समोर येत आहे. शिवाय भाजपच्या दोन आमदारांमधील सध्या सुरु असलेले अप्रत्यक्ष वादही सर्वश्रुत आहेत. त्यात बेलापुरमध्ये संदीप नाईक जास्त सक्रिय होत असून मी निवडणूक लढवावी अशी तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांच्या भावनेचा मी सन्मान करतो, पक्ष योग्य न्यायपूर्ण निर्णय घेईल असे नाईक यांनी एका कार्यक्रमाला दरम्यान प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून नाईक कोणत्या मतदारसंघातून निवडणुक लढवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बेलापुरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु केल्यानंतर मा.आ.संदीप नाईक या मतदार संघात विविध उपक्रम राबवत आहेत. शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी, विकास करण्यासाठी आपण प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरु करणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी संगितले होते. सर्व नोडमध्ये छत्री वाटप, आरोग्य, शैक्षणिक शिबीरे, महिलांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान, ज्येष्ठांचा संवाद व सन्मान, असे सामाजिक कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे संदीप नाईक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेलापुरमधून उभे राहणार अशी चर्चा रंगली आहे. त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान संदीप नाईक विधानसभा लढणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर ‘मी निवडणूक लढवावी अशी तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांच्या भावनेचा मी सन्मान करतो. याबाबत पक्ष योग्य न्यायपूर्ण निर्णय घेईल' असे ते म्हणाले.
नवी मुंबई शहराच्या हितासाठी संघर्ष सुरूच राहील. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी शहराचे अहित होऊ देणार नाही, असा निर्धार नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी बोलून दाखवला आहे. बेलापूर शहरात आपण सर्वाधिक काम केले आहे. पण कोणत्याच कामाचे कधी मार्केटिंग केलं नाही. निवडणुका आल्या की स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी विरोधकांकडून आमच्यावर टीका केली जाते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यापूर्वी कधीही निर्णय घेतले नाहीत यापुढेही निर्णय घेणार नाही. आमची कोंडी करणाऱ्यांचा सामना करण्यास आम्ही समर्थ आहोत. परंतु शहराची कोंडी होऊ देणार नाही असेही नाईक यावेळी म्हणाले. एकंदरीत आपण निवडणुक लढणार असल्याचे संकेत नाईक यांनी दिले असून ते कोणत्या मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai