Breaking News
नवी मुंबई ः आंध्र प्रदेश शासनातर्फे आंध्र मधील अमरावीत येथील 217 चौ.कि.मी. क्षेत्रावर राजाधीनचे शहर विकसित करणे नियोजित आहे. त्यासाठी सिडकोच्या नगर नियोजनातील उत्कृष्ट प्रथा, पद्धती आणि आर्थिक प्रारुपांचा अभ्यास करण्याकरिता सिडकोच्या विविध विकास प्रकल्पांना भेट देण्याच्या पार्श्वभुमीवर आंध्र प्रदेशच्या नगरपालिका प्रशासन व नगर विकास मंत्र्यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या विविध प्रकल्पस्थळांना भेट दिली.
आंध्र प्रदेशचे नगरपालिका प्रशासन आणि नगर विकास मंत्री, डॉ. पी नारायण गारू यांनी बुधवार, दि. 31 जुलै रोजी सिडकोच्या विविध प्रकल्पस्थळांना भेट दिली. प्रकल्प स्थळांना भेट दिल्यानंतर सिडको भवन येथे आंध्र प्रदेशच्या शिष्ट मंडळातील सदस्यांकरिता सिडकोच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. आंध्र प्रदेश शासनातर्फे आंध्र मधील अमरावीत येथील 217 चौ.कि.मी. क्षेत्रावर राजाधीनचे शहर विकसित करणे नियोजित आहे. या प्रकल्पांतर्गत शहरांतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, दळणवळण इ. पायाभूत सुविधांसह सचिवालय, विधीमंडळ, उच्च न्यायालयाच्या इमारती विकसित करण्यात येणार आहेत. या सुविधांसह शासकीय गृहनिर्मितीही नियोजित आहे. या संदर्भात भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण स्वयंपूर्ण शहरे विकसित करण्याचा दीर्घ अनुभव असणाऱ्या सिडकोच्या नगर नियोजनातील उत्कृष्ट प्रथा, पद्धती आणि आर्थिक प्रारुपांचा अभ्यास करण्याकरिता सिडकोच्या विविध विकास प्रकल्पांना भेट देण्याच्या अनुषंगाने या भेटीचे नियोजन सिडकोतर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, एपीसीआरडीएचे आयुक्त कटानेनी भास्कर, अतिरिक्त आयुक्त एम. नवीन, अतिरिक्त आयुक्त प्रवीण चंद तसेच सिडकोचे मुख्य नियोजनकार रवींद्र मानकर, मुख्य अभियंता (नवी मुंबई) एन. सी. बायस, आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai