Breaking News
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी
खारघर : खारघर ते सीबीडी 30 मीटर रुंदीच्या कोस्टल रोड उभारणीला भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयने परवानगी दिल्यामुळे 8 वर्षांपासून रखडलेल्या खारघर ते सीबीडी खाडीकिनारा कोस्टल रोडचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची वाहतुकीतून सुटका होणार असून कळंबोली, कामोठे आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळ गाठणे आता सोयीचे होणार आहे.
सिडकोने नवी मुंबई प्रकल्प उभारण्याचा संकल्प हाती घेताना तळोजा, कळंबोली आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळ विना अडथळा जाता यावे यासाठी सिडकोने खारघर ते सीबीडी खाडीकिनारा 6.96 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडसाठी 2018 साली निविदा काढली काढून 273 कोटीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र, सदर प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून परवानगीसाठी सिडकोकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला यश मिळत नव्हते. अखेर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयच्या तज्ञ मूल्यांकन समितीने कोस्टल रेग्युलेशन झोन नुसार खारघर ते सीबीडी-बेलापूर, सेक्टर-15 दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बांधकामाला परवानगी दिली दिल्यामुळे खारघर ते सीबीडी दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
खारघर रेल्वे स्थानकाच्या मागे सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनातून जवळपास 2 हजाराहून अधिक घरे उभारली जात आहे. सदर प्रकल्प कोस्टल रोड आणि खारघर रेल्वे स्थानकाला लागून असल्यामुळे येथील घरांना अधिक मागणी असणार असून अनेकांचे या गृहनिर्माण प्रकल्पाकडे लक्ष लागले आहे.
कोस्टल रोडचेे फायदे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai