अखेर ओएनजीसीकडून नागाव ग्रामपंचायतला मिळाला वाढीव कर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 29, 2024
- 688
3 कोटींचा कर सुपुर्द; दरवर्षी मिळणार 58 लाख रुपये
उरण ः नागाव गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या शेतजमिनी या ओएनजीसी कंपनीच्या प्रकल्पा करिता दिल्या होत्या. त्यामुळे ओएनजीसी कंपनीने अनेकांना रोजगार दिला तसेच नागाव ग्रामपंचायतला टॅक्स सुद्धा भरत आहे. मात्र 2012 पासून हा टॅक्स वाढीव स्वरूपात मिळाला नाही. याप्रकरणी नागाव ग्रामपंचायतीने केस दाखल केली होती. यामध्ये निकाल ग्रामपंचायतीच्या बाजुने लागल्याने ओएनजीसीतर्फे नागाव ग्रामपंचायतला वाढीव टॅक्स 3 कोटी रुपये मिळाले आहेत.
नागाव ग्रामपंचायत तर्फे उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती. ती केस आता नागाव ग्रामपंचायतने जिंकली असून या केस संदर्भात व वाढीव कर संदर्भात ओएनजीसी प्रशासनाने सुद्धा सकारात्मक भूमिका घेतल्याने आता वाढीव टॅक्स ग्रामपंचायतला मिळणार आहे. दर 4 वर्षांनी टॅक्स वाढतो. दर 4 वर्षांनी टॅक्स मध्ये वाढ करावी असा शासनाचा नियम आहे. मात्र ग्रामपंचायतला 2012 सालापासून कोणताही वाढीव टॅक्स ग्रामपंचायतला मिळाला नाही. त्यासाठी ग्रामपंचायत तर्फे उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती. या केसचा निकाल नागाव ग्रामपंचायच्या बाजुने लागला आहे. वाढीव कर संदर्भात ओएनजीसी प्रशासनाने सुद्धा सकारात्मक भूमिका घेतल्याने आता वाढीव टॅक्स ग्रामपंचायतला मिळणार आहे. उच्च न्यायालयाने ओएनजीसी कंपनीला आजपर्यंतचे वाढीव टॅक्स 3 कोटी व दर 4 वर्षांनी वाढीव टॅक्स देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे ओएनजीसी तर्फे नागाव ग्रामपंचायतला वाढीव टॅक्स 3 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निर्णय नागाव ग्रामपंचायत साठी ऐतिहासिक निर्णय आहे. ओएनजीसी कंपनी नागाव ग्रामपंचायतला वर्षाला 9 लाख 65000 टॅक्स देत होती. या निर्णयामुळे इथून पुढे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागाव ग्रामपंचायतला ओएनजीसी कंपनीकडुन दर वर्षाला 58 लाख रुपये टॅक्स मिळणार आहे. या टॅक्स मधून गावच्या विकासाची विविध विकास कामे करण्यात येणार आहे. अनेक प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत अशी माहिती नागाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी किरण केणी यांनी पत्रकारांना दिली.
8 दिवसापूर्वी वाढीव टॅक्स संदर्भात नागाव ग्रामपंचायतने ओएनजीसी विरोधात दाखल केलेल्या केस संदर्भात उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. उच्च न्यायालयात वकील सी. जी. गावणेकर यांनी चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतची बाजू मांडली. सरपंच पदावर असताना हरिष कातकरी यांनी तसेच उपसरपंच पदावर असताना स्वप्नील माळी यांनीही यासाठी लढा दिला. गटविकास अधिकारी समीर वाठारकर,विद्यमान सरपंच चेतन काशिनाथ गायकवाड, उपसरपंच भूपेंद्र मोतीराम घरत तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी किरण केणी यांनी उत्तम रित्या, नियोजन बद्ध कायदेशीर लढा दिल्याने सदर प्रश्न मार्गी लागला आहे.
पाऊणे दोन कोटी रुपये ग्रामपंचायतची पाणी पट्टी थकीत आहे. सव्वा कोटी रुपये स्ट्रीट लाईटचे वीज बिल थकीत आहे. पाणी पट्टी व वीज बिलाचे हे पैसे शासनाला भरायचे आहेत. ग्रामपंचायतला मिळालेल्या 3 कोटी रुपयाच्या करामधून पाणी पट्टी व वीज बिल भरण्यात येणार आहे. तसेच नागाव ग्रामपंचायतला स्वतःची जागा नाही.जिल्हा परिषद शाळेच्या जागेत ग्रामपंचायतची इमारत आहे. त्यामुळे स्वतःच्या हक्काची जागा व इमारत व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. - चेतन गायकवाड, सरपंच, नागाव ग्रामपंचायत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai