Breaking News
नवी मुंबई ः गोपाळकाळाच्या मुहूर्तावर सिडकोकडून नवी मुंबईत 902 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेंतर्गत कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिका उपलब्ध होणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 38 व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 175 याप्रमाणे एकूण 213 सदनिका तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मिळून एकूण 689 सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेतील सदनिका त्वरीत ताबा स्वरूपात उपलब्ध असतील.
सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. या वर्षीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.
कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच 27 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे. सिडकोने जाहीर केलेल्या या आगामी योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 आणि सर्वसामान्य गटासाठी 175 अशा एकूण 213 सदनिका उपलब्ध असणार आहेत. तर खारघरमध्ये सिडकोच्या स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील 689 घरांचाही या योजनेमध्ये समावेश असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या घरांपासून जवळच रेल्वे स्थानकं, रस्ते, मेट्रोसेवा अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai