Breaking News
राज ठाकरे यांची नवी मुंबई पदाधिकाऱ्यांना सूचना
नवी मुंबई ः राज ठाकरे यांनी सोमवरी नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकाऱ्यांना संघटना कशी वाढवावी, लोकांशी कसा संपर्क साधावा याचा कानमंत्र देतानाच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता म्हणून प्रथम काम करा, आपापले हेवेदावे बाजूला ठेवा व पक्षवाढीसाठी प्रयत्न करा, असा सज्जड दम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
17 जूनपर्यंत पदाधिकाऱ्यांनी आपले आत्मपरीक्षण करून पक्षाच्या कामासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निरोपाची किंवा संपर्काची वाट बघू नका तर पक्ष म्हणून मनापासून काम करण्याचा आदेश दिला. 17 जूनला याबाबत पुन्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर नवी मुंबईत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह कला, क्रीडा, सामाजिक कार्य, हॉटेल व्यवसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांशीही ठाकरे यांनी संवाद साधला. या वेळी मनसेच्या संघटनात्मक दौऱ्यांसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai