Breaking News
नवी मुंबई ः प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा याविषयी पालिकेकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार व उपायुक्त श्री सोमनाथ पोटरे आणि डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर 11 बेलापूर येथील पुनीत टॉवरमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी रहिवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
बेलापुर विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधला आणि प्लास्टिक पिशव्यांचा दैनंदिन जीवनातील वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन केले व त्याची गरज स्पष्ट केली. रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर रहिवाशांची भेट घेता आली व त्यांच्याशी संवाद साधता आला. ‘वापर करा, स्वच्छ करा आणि परत करा' ही संकल्पना नजरेसमोर ठेवून सोसायटीमध्ये कापडी पिशवी बँकचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सोसायटीतील सर्व रहिवाशांना सिंगल युज प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली तसेच ‘माझी वसुंधरा अभियान' व ‘सिंगल युज प्लास्टिक न वापराची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व रहिवाशांना व घरोघरी सर्वोदय बँक यांनी पुरस्कृत केलेल्या 200 कापडी पिशव्यांचे तेरणा इंजीनियरिंग कॉलेज नेरुळ मधील एनएसएस विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai