Breaking News
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात यशस्वी उपचार
नवी मुंबई : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईच्या सर्जनने 60 वर्षांच्या एका रुग्णावर अतिशय गुंतागुंतीची, मल्टी-स्टेज कम्बाइन्ड कार्डियाक आणि व्हस्क्युलर सर्जरी यशस्वीपणे पार पाडली. या दुर्मिळ सर्जरीला मिळालेल्या यशामुळे कार्डिओव्हस्क्युलर आजारांनी त्रस्त रुग्णांना आशेचा किरण मिळाला आहे.
रुग्णाच्या कोरोनरी आर्टरीज आणि पायांच्या आर्टरीजमध्ये गंभीर ब्लॉकेज होते, त्यामुळे छाती व पायांमध्ये खूप वेदना होत होत्या. तपासणीमध्ये दिसून आले की, त्यांना क्रिटिकल कॅल्सिफाईड ट्रिपल व्हेसल हा आजार आणि दोन महत्त्वाच्या रक्तपेशींमध्ये पूर्ण ब्लॉकेज आहेत. कार्डिओव्हस्क्युलर सर्जन डॉ अमजद शेख यांनी सांगितले, रुग्णाच्या संपूर्ण व्हस्क्युलर सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर ब्लॉकेज होते, त्यामुळे ही केस खूपच आव्हानात्मक होती. रुग्णाच्या डाव्या पायात आणि छातीमध्ये खूप वेदना होत होत्या. त्यांना मधुमेह होता आणि ते गेल्या 30 वर्षांहून जास्त काळापासून भरपूर धूम्रपान करत होते. ईसीजी, अँजिओग्राफी आणि डॉप्लर या तपासण्यांमध्ये आढळून आले की, त्यांच्या कोरोनरी आर्टरीज, एओर्टा आणि पायांपर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या आर्टरीजमध्ये गंभीर ब्लॉकेजेस होते. प्राणवायू मिसळलेले रक्त संपूर्ण शरीरापर्यंत घेऊन जाणाऱ्या इन्फ्ररीनल एओर्टामध्ये संपूर्ण ब्लॉकेज आणि डाव्या इंटर्नल कॅरोटिडमध्ये 90% ब्लॉकेज होते. सुरुवातीला हे रुग्ण सर्जरीसाठी तयार नव्हते. त्यामुळे वैद्यकीय टीमने शरीरावर कमीत कमी चिरा देऊन स्टेन्टिंग करण्याचा प्रयत्न केला, पण ब्लॉकेज इतके जास्त आणि गंभीर होते की स्टेंट जाऊच शकला नाही. रुग्णाला समुपदेशन करण्यात आले, त्यानंतर ते सर्जरीसाठी तयार झाले. अतिशय दुर्मिळ अशी ही सर्जरी सिंगल स्टेजमध्ये करण्यात आली. हृदयाची संपूर्ण आर्टेरियल बायपास सर्जरी आणि छातीच्या आर्टरीपासून पायांच्या आर्टरीपर्यंतची बायपास सर्जरी एकाच वेळी केली गेली. त्यादरम्यान धडधडत्या हृदयाचे तीन ग्राफ्ट्ससोबत सीएबीजी (कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट) करण्यात आले. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (सीएबीजी) ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंपर्यंत रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ब्लॉक झालेल्या कोरोनरी आर्टरीजच्या चारी बाजूला रक्ताच्या प्रवाहाला रिडायरेक्ट केले जाते.
आर्टरीज ब्लॉक झाल्यामुळे पायांमध्ये रक्ताचा प्रवाह कमी झाला होता आणि पेरिफेरल आर्टरीचा आजार झाला होता, त्यावर उपचार करण्यासाठी पायांच्या आर्टरीजचे एक्स्टेन्सिव्ह बायपास केले गेले. या प्रक्रियेमुळे पायांमध्ये रक्त प्रवाह पुन्हा सुरु झाला. या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये उच्च स्तरावरील सर्जिकल नैपुण्ये आणि अतिशय काळजीपूर्वक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची गरज असते. सर्जरीनंतर रुग्णाच्या तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होऊ लागली. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी त्यांना एक्स्ट्युबेट करून, त्याच्या दुसऱ्या दिवशी बेडवरुन उठवण्यात आले. फक्त तीन दिवसांत ते अजिबात वेदना न होता नीट चालू फिरू लागले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai