Breaking News
ऑगस्टमध्ये वितरण होण्याची शक्यता : 936 खेळाडूंना होणार लाभ
नवी मुंबई : शहरातील पात्र क्रीडापटूना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2022-23 या कालावधीतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंच्या शिष्यवृत्तीचे कामकाज आचारसंहितेच्या कारणास्तव रखडले होते. ते आता पूर्णत्वाकडे आले असून ऑगस्ट महिन्यामध्ये खेळाडूंना शिष्यवृत्ती तसेच ट्रॅक सूट चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबई क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता सर्व क्रीडा प्रकारातील प्राविण्य प्राप्त तसेच होतकरू खेळाडूंना महापालिकेतर्फे दरवर्षी शिष्यवृत्ती तसेच ट्रॅक सूटचे वाटप करण्यात येते. त्यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढण्यास मदत होत आहे. सन 2022-23 या वर्षामधील पात्र खेळाडूंची शिष्यवृत्ती अनेक कारणास्तव रखडली होती. परंतु निवडणूक प्रक्रियेनंतर आता विविध क्रीडा प्रकारातील एकूण 936 खेळाडूंच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला असून सुमारे 30 लाख 61 हजार रुपयांची शिष्यवृत्ती या खेळाडूंमध्ये वितरित करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 12 लाख 50 हजार रुपयांचा खर्च या खेळाडूंच्या ट्रॅक सूटवर करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये त्याचे वितरण करण्यात येणार असून सप्टेंबरमध्ये नवीन क्रीडा शिष्यवृत्तीसाठीही अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai