Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छता ही सेवा मोहीमेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी सहभागावर भर देण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' अभियान अंतर्गत मुलांमध्ये जाणीव जागृती करण्यात येत आहे.
अशाच प्रकारचा स्वच्छताविषयक रांगोळी स्पर्धेचा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक व 23 माध्यमिक शाळांसह 333 खाजगी शाळांमध्ये राबविण्यात आला. ज्यामध्ये 10410 विद्यार्थ्यांनी सहभागी होत रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला. सहभागींमध्ये अर्थातच विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. रांगोळीच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक प्रतिबंध, कापडी पिशव्यांचा वापर, स्वच्छतेचे महत्व असे विविध विषय विद्यार्थ्यांनी चित्रे तसेच संदेश रूपात साकारले. या देखण्या रांगोळ्यांनी शाळेतील पॅसेज सुंदर व अर्थपूर्ण रंगावलीने नटून गेला. अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थी स्वकृती करीत अभियानात स्वच्छताविषयक जागरूकतेने सहभागी होत असून याव्दारे स्वच्छतेचा संस्कार करण्याचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai