Breaking News
सांस्कृतिक लोककलांचे उत्तम सादरीकरण; चार स्पर्धांमध्ये पटकावले पारितोषिक
नवी मुंबई ः नवी मुंबई अखिल भारतीय महिला वकील संघटनेचे 7 वे राष्ट्रीय संमेलन 28 व 29 सप्टेंबर रोजी बेंगलोर (कर्नाटक) येथे पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यालयालयाचे न्यायमूर्ती बेला एम- त्रिवेदी यांच्या हस्ते तर स्मरणिकेचे उद्घाटन न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या हस्ते झाले.
या राष्ट्रीय संमेलनास महाराष्ट्र राज्यातुन 128 महिला वकील प्रतिनिधी उपस्थित होत्या. अखिल भारतीय महिला वकील संघटनेच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट जयश्री अकोलकर यांनी सर्वोतपरी सहकार्य करून जास्तीत जास्त महिला वकिलांनी महाराष्ट्रातुन सहभागी होण्यासाठी मदत केली. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक नृत्य व संगीत खुर्ची मध्ये महाराष्ट्रातील महिला वकिलांना प्रथम पारितोषिक मिळाले. जास्तीत जास्त महिला वकील उपस्थित संख्या या साठी द्वितीय पारितोषिक मिळाले, तसेच धावणे या स्पर्धेत तिसरे पारितोषिक मिळाले.
उत्साहात पार पडलेल्या या राष्ट्रीय संमेलनास उपस्थित भारताच्या वेगवेगळ्या राज्यामधून आलेल्या जवळपास 1200 महिला वकील प्रतिनिधींसमोर महाराष्ट्राची लोककला पोवाडा नृत्याविष्कारातून सादर करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला गेला. उल्लेखनीय बाब म्हणजे नवी मुंबईतील ॲडव्होकेट रुपाली सुनील काकडे यांचे हे नृत्याविष्कारातील हिरकणी पोवाड्याचे सादरीकरण कर्नाटकच्या विधानभवन(विधान सौदा) मध्ये झाले. गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासातील हिरकणीची धाडसी यशोगाथा काकडे यांनी आपल्या कुशल व भावपूर्ण अभिनयातुन सहज लिलयाने व प्रभावीपणे सादर केली. ॲडव्होकेट रुपाली काकडे यांच्या सादरीकरणामुळे महाराष्ट्राची लोककला राष्ट्रीय पातळीवर झळकल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास कर्नाटक हायकोर्टचे सरन्यायधिश व्ही. अंजारिया तसेच श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यालयालयाच्या न्यायमूर्ती कुमुदिनी व भारताचे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, व सुष्म-लघु मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे, कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के.पाटील, व विधानसभा सदस्य ए.एस. पोन्नण्णा उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai