Breaking News
मनसेची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार
नवी मुंबई ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी व त्याची पुरवणी यादी प्रकाशित केली आहे. नवी मुंबई 151 बेलापूर विधानसभेमध्ये एकूण 4 लाख 15 हजार 436 नावे असून या सर्व मतदार याद्यांची सखोल छाननी करताना काही गंभीर अनियमितता आढळून आली. याप्रकरणी मनसेन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
राज्य निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये 15 हजार दुबार नावे तर 18 हजार मतदारांचे वास्तव्य नसल्याचे आढळून आल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. हे मतदार बोगस नोंदवलेली असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन मतदार याद्यांच्या पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारच्या कारभारामुळे पारदर्शक व नि:ष्पक्ष निवडणूक ह्या संकल्पनेला छेद जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सदर बोगस व दुबार नावे वगळली न गेल्यास याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रसंगी मनसे पदाधिकारी विलास घोणे, सचिन कदम, अभिजित देसाई, आप्पासाहेब कोठुळे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai