Breaking News
नवी मुंबई : फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी सोबत सीआरपीएफ (वेस्टर्न सेक्टर), लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि नवी मुंबई महापालिका यांनी नुकतीच स्वच्छ भारत दिवस निमित्त मिनी सी शोअर येथे समुदाय-केंद्रित स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. 150 हून अधिक नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. यावेळी सफाई मित्रांचा सन्मानही करण्यात आला.
स्वच्छता हा आपल्या दैनंदिन जिवनातील एक अविभाज्य भाग आहे. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह पर्यावरणावरही होत असतो. 2 ऑक्टोबरला असणाऱ्या स्वच्छ भारत दिवसानिमित्त फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी, सीआरपीएफ (वेस्टर्न सेक्टर), लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील मिनी सी शोअर येथे ही मोहिम राबविण्यात आली. सीआरपीएफ वेस्टर्न सेक्टरचे डीआयजी रविंद्र सिंग रौतेला, नवी मुंबई महानपालिकेचे स्वच्छता अधिकारी वीरेंद्र पवार, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट चे लायन डॉ. प्रताप मुदलियार व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सीए एन. आर. परमेश्वरन, फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्रच्या व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी आणि फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशीचे फॅसिलिटी डायरेक्टर नितीन कमारिया यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी नागरिकांना पर्यावरण स्वच्छ ठेवण्याप्रती प्रेरित केले, तसेच त्यांना आरोग्यदायी वातावरणात राहिल्याने आजार-मुक्त समुदायाप्रती कशाप्रकारे योगदान देता येऊ शकते याबाबत जागरूक करण्यात आले. तसेच सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. एस. नारायणी म्हणाल्या, फोर्टिस प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देण्यामध्ये नेहमी अग्रस्थानी आहे आणि आमचा विश्वास आहे की आरोग्यदायी समुदायाची सुरूवात स्वच्छ वातावरणासह होते. ही मोहिम आम्हाला समुदायाचे ऋण फेडण्याची संधी देते, तसेच नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना जागृत करते. आम्ही या सहयोगासाठी नवी मुंबई महानगरपालिका, सीआरपीएफ (वेस्टर्न सेक्टर) आणि लायन्स इंटरनॅशनल यांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी एकत्र येऊन हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai