Breaking News
आमदार गणेश नाईक यांचा पालिका प्रशासनाला इशारा
नवी मुंबई ः ऐन पावसाळ्यात नवी मुंबईतील विविध भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेचे स्वतःचे धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पाणी पुरवठा खंडीत होत असल्याप्रकवणी आमदार गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केला. तसेच पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर लोकशाही मार्गाने जळजळीत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
नवी मुंबईच्या विविध प्रश्नांवर लोकनेते आमदार नाईक यांची 84वी बैठक महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याबरोबर मंगळवारी पार पडली. त्याप्रसंगी त्यांनी जनतेच्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडून त्या तत्परतेने सोडविण्याची सूचना केली. या बैठकीमध्ये आमदार नाईक यांनी पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडत दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सर्वच भागात नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होत असल्याचे सांगितले. यंदा मोरबे धरण काठोकाठ भरले असताना देखील पाणीपुरवठा अनियमित होतो आहे. प्रशासकीय कालावधीमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नवी मुंबईला दैनंदिन किती पाणीपुरवठा होतो, आपल्या स्त्रोतामधून किती पाणीपुरवठा होतो तसेच मोरबे धरणातून अन्यत्र कुठे पाणीपुरवठा केला जातो? याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मागवल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाहीतर प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai