Breaking News
नवी मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. नवी मुंबई पोलिसांनी अॅट्रॉसिटी प्रकरणी केतकी चितळेला गुरुवारी (19 मे) ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले. केतकी चितळे विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये 2020 ला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. तिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य सोशल मीडियावर करण्याचा आरोप आहे.
केतकी चितळेविरोधात 2020 मध्ये दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सप्टेंबर 2021 मध्ये ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जामीन अर्ज देखील फेटाळून लावला होता. त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर आता या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai