राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 ला निकाल
- by मोना माळी-सणस
- Oct 15, 2024
- 440
नवी मुंबई ः सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल असे निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्यापुर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे कधी निवडणुकीची घोषणा होते याकडे राज्यभरातील लोकप्रतिनिधींसह मतदारा राजाचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार 22 ऑक्टोबररोजी अधिसूचना काढल्यानंतर उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी होईल.
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून यात महिला 4.64 कोटी, पुरुष 4.97 कोटी आहेत. महाराष्ट्रात एक लाख 186 मतदान केंद्र असतील.
वैशिष्टये
- 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
- व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते पाहू शकतात.
- मतदान केंद्र परिसरात मतदार रांगांमध्ये जागोजागी बाकडे किंवा खुर्चा ठेवल्या जातील. जेणेकरुन मोठी लाईन असल्यास थोडा वेळ बसता येईल.
महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक-
- अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
- अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
- मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
- मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर
288 जागांसाठी किती मतदार असतील?
- एकूण मतदार - 9 कोटी 59 लाख
- नव मतदार - 19.48 लाख
- पुरूष मतदार - 4.95 कोटी
- महिला मतदार - 4.64 कोटी
- तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
- 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
- शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
- दिव्यांग मतदार - 6.32 लाख
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस