Breaking News
सिडको एमडींचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
नवी मुंबई ः सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवार, दि. 01 मार्च 2024 रोजी सिडकोच्या उलवे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने व वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
विजय सिंघल यांनी 23 फेब्रुवारी 2024 रोजी सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी सिडकोतील विभाग प्रमुखांची बैठक बोलावून सिडकोच्या विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तद्नंतर आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भौतिक प्रगतीची पाहणी करण्याच्या उद्देशाने विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट दिली. या प्रसंगी शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, कॅप्टन बीव्हीजेके शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि नियोजित वेळेत व्हावी या उद्देशाने प्रकल्पाच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेणे, हे आजच्या भेटीमागील प्रयोजन आहे. - विजय सिंघल,उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai