Breaking News
मुंबई : शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाचा फैसला 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचा फैसला आता 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कसा सुटणार याचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. दरम्यान घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल, व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सात न्यायामूर्तींच्या खंडपीठाची गरज का आहे हे कोर्टाला सांगितलं. नबाम रेबिया खटल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यावर कोर्टाने जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याबाबतची सुनावणी घेण्याची अनुमती दर्शवली. मात्र महाधिवक्त्यांनी 14 फेब्रुवारीनंतर ही सुनावणी घेता येईल का अशी विचारणा केली. त्यावर कपिल सिब्बल यांच्या म्हणण्याप्रमाणे 14 फेब्रुवारी हा अतिशय शुभ दिवस आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी इथे न थांबता घरी असायला हवे असं न्यायमूर्ती शाह म्हणाले. त्यावर सरन्यायाधीशांनी आपण 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी करु शकतो असं सांगत, सुनावणीची पुढची तारीख जाहीर केली. यामुळे आता 14 फेब्रुवारीला काय होणार याची उत्सुकता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai