खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अनधिकृत फुटबॉल टर्फ 15 दिवसांत हटवा

सिडकोचे संबंधित शाळा प्रशासनांना आदेश ; अन्यथा करारनामा रद्द करणार 

नवी मुंबई ः सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदानांवर अवैधरित्या फुटबॉल टर्फ उभारून नवी मुंबईतील मैदाने बळकावल्याप्रकरणी खाजगी शिक्षण संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिडको प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत सिडको प्रशासनाने 18 जानेवारी 2023  रोजी या खाजगी शिक्षण संस्थांना नोटीस काढून फुटबॉल टर्फ 15 दिवसांत निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास सिडको प्रशासन संबंधित शिक्षण संस्थांचे करारनामे रद्द करण्याचा इशारा दिला आहे. 

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने सिडकोने शिक्षण संस्थांना मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. शैक्षणिक वेळे व्यतिरिक्त ही मैदाने सर्वसामान्यांसाठी खुली ठेवणे सिडको करारनाम्या नुसार बंधनकारक आहे. परंतु नवी मुंबईतील अनेक शिक्षण संस्थांनी ही मैदाने बंदिस्त करून त्यावर पक्के बांधकाम करून फुटबॉल टर्फ उभारले आहेत. तसेच ही फुटबॉल टर्फ त्रयस्थ संस्थांना भाडे तत्वावर देऊन या सार्वजनिक मैदानांचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर सुरु केल्याने मनसेने याविरुद्ध आवाज उठवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या बंदिस्त मैदानांचा वापर करण्यास या शिक्षण संस्था मज्जाव करतात. फुटबॉल टर्फच्या माध्यमातून लाखोंचा मलिदा खाण्याचे काम राजरोसपणे हे शिक्षण संस्थाचालक करत आहेत. महिन्याला जवळपास सहा ते आठ लाखांची कमाई हे शिक्षण संस्था चालक करत आहेत. सिडको बरोबर केलेल्या करारनाम्याचे हे सरळपणे उल्लंघन आहे. त्यामुळे स्थानिकांना व विद्यार्थ्यांना देखील या मैदानांचा वापर करता येत नाही. याविषयी मनसेने सिडकोकडे तक्रार केली होती. 

मनसेच्या पाठपुराव्यानंतर सिडकोने या शिक्षण संस्थांना नोटीस जाहीर केल्या आहेत. या नोटीस मध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत कि येत्या 15 दिवसांत हे सर्व फुटबॉल टर्फ निष्कासित करण्यात यावेत. तसे न केल्यास सिडको आपला करारनामा रद्द करेल. यावर आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या सर्व दोषी शिक्षण संस्थांना 15 दिवसांत फुटबॉल टर्फ निष्कासित न केल्यास तीव्र आंदोलन करून फूटबॉल टर्फ उखडण्याचा इशारा दिला असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट