खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नालेसफाईची कामे विहीत वेळेत पूर्ण करा

आयुक्तांचे संबंधित विभागांना आदेश

नवी मुंबई ः शहरात सुरु असलेल्या नैसर्गिक नालेसफाईच्या कामांना गती देऊन विहीत मुदतीत नालेसफाई पूर्ण केली जावी असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना दिले. तसेच नालेसफाई करताना काढला जाणारा गाळ एक ते दोन दिवसात सुकल्यानंतर त्वरित उचलला जावा असेही निर्देश दिले.

पावसाळा कालावधीपूर्वी नैसर्गिक नालेसफाई व बंदिस्त गटारे सफाई कामांची ठिकठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी घनकचरा व्यवस्थापन व अभियांत्रिकी विभागाला गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा भागात 76 लहान, मोठे नैसर्गिक नाले असून यामध्ये एमआयडीसी क्षेत्रातील नाल्यांचाही समावेश आहे. या नाल्यांच्या सफाईची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून आत्तापर्यंत 55 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. यानुसार आधी निर्देशित केल्याप्रमाणे 25 मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. पावसाळ्यापूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील लहान मोठ्या 76 नैसर्गिक नाल्यांतील गाळ काढून नाल्यांमध्ये जास्तीत जास्त पाणी सामावले जावे म्हणून नाल्यांचे पात्र खोल करण्यासाठी नालेसफाई करण्यात येते. ही ठिकठिकाणी सुरू असलेली नालेसफाईची कामे योग्य रितीने होत असल्याबाबत खातरजमा करून घेण्यासाठी आयुक्त नार्वेकर यांनी बेलापूरपासून सुरुवात करीत नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. हर्डेलिया कंपनी जवळील लक्ष्मीनगर येथील नाला सायन पनवेल हायवेखाली असलेल्या कल्व्हर्ट मधून पुढे जात असल्याने या रस्त्याखालील मोठ्या कल्व्हर्टची सफाई व्यवस्थितरित्या केली जावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. शहरातील पाणी साचण्याच्या संभाव्य 14 ठिकाणी आवश्यक संख्येने पाणी उपसा पंपांची आत्तापासूनच व्यवस्था करून ठेवावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. एमआयडीसी क्षेत्रातीलही नालेसफाई काटेकोरपणे करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या व एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाई कामांची पाहणी केली. नालेसफाईतून निघणारा गाळ वाहून नेणे सोयीचे व्हावे म्हणून तो सुकण्यासाठी काठांवर ठेवला जातो. हा गाळ 48 तासात उचलावा असेही निर्देशित केले. 

बंदिस्त गटारे सफाईचे काम 97 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित 5 टक्के काम काही ठिकाणी आलेल्या अडचणींमुळे करता आलेले नाही, त्या कामाकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते काम पूर्ण करून घ्यावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. पाहणी दौ-यामध्ये काही ठिकाणांवर अचानक थांबत आयुक्तांनी गटारांची झाकणे उघडून बंदिस्त गटारांची साफसफाई कशा रितीने झाली आहे याची प्रत्यक्ष पाहणी केली. काही जागांवर गटारांच्या काठाशी गाळ दिसल्याने त्यांनी तो त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. यापूर्वी बंदिस्त गटारे सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 43 ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बंदिस्त गटारे सफाईप्रमाणेच नैसर्गिक नालेसफाई कामातही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट