खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


5 वर्षात 5 लाख रुग्णांवर उपचार

वन रुपी क्लिनिकला पाच वर्षे पूर्ण ; 1 रुपया शुल्क

मुंबई ः आरोग्य क्षेत्रातील महागाई गगनाला भिडत असताना वन रुपी क्लिनिक ही संस्था अत्यंत माफक दरात प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहे. गेली 5 वर्ष हे कार्य अव्याहत सुरू आहे. 2017 ते 2022 अशा पाच वर्षांच्या कालावधीत वन रुपी क्लिनिकने पाच लाख रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली. केवळ एक रुपयात वैद्यकिय उपचार देणारे हे आरोग्य केंद्र नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. 

डॉक्टर राहुल घुले यांनी 2017 साली सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन वनरुपी क्लिनिक ही संकल्पना राबवण्याचा संकल्प केला. त्यांना त्यांचे बंधू डॉ.अमोल घुले यांनी तोलामोलाची साथ दिली. प्रारंभी घाटकोपर आणि कुर्ला या दोन रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिकला सुरुवात झाली. परवडणार्‍या दरात आरोग्य सुविधा सर्वसामान्य रुग्णांना मिळावी या एकमेव हेतूने वन रुपी क्लिनिकची सुरुवात झाली. आज मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 30 ठिकाणी वन रुपी क्लिनिक कार्यरत आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर उत्तर प्रदेश आणि बिहार येथील नऊ रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिक कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या बनारस मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात, त्या बनारस रेल्वे स्थानकावर देखील वनरुपी क्लिनिक रेल्वे प्रवाशांना सेवा देणार आहे.

फक्त एक रुपयात तपासणी इथे केली जाते, शंभर रुपयात ईसीजी काढला जातो, फक्त दहा रुपयात शुगर टेस्ट केली जाते आणि याचा लाभ आजवर पाच लाख पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला आहे. वनरुपी क्लिनिकमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. मुख्य म्हणजे प्रवास करताना अचानक आरोग्यासंबंधी आणीबाणीची परिस्थिती ओढावली तर रेल्वे परिसरात आरोग्य केंद्र असल्याने तत्काळ उपचार मिळणार्‍या वन रुपी क्लिनीकचा मोठा आधार नागरिकांना मिळत आहे. तसेच रेल्वे अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार मिळाले तर नक्कीच प्राण वाचू शकतात. अशा तीन हजाराहून अधिक अपघातग्रस्त रुग्णांवर वन रुपी क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. जवळपास शंभर ते दीडशे हार्ट अटॅकच्या रुग्णांवर वन रुपी क्लिनिकमध्ये प्रथमोपचार झाल्याने त्यांचे देखील प्राण वाचले आहेत. वन रुपी क्लीनिकमध्ये आजवर 15 ते 20 महिला प्रवाशांची प्रसूती करण्यात आले आहेत. वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून 200 जणांना नोकर्‍याही मिळाल्या आहेत.

एका मराठी तरुणाने सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याचं ठरवलं आणि त्यातून वनरुपी क्लिनिक सारखं एक कार्य उभं राहिलं आहे. भविष्यात अशा प्रकारच्या कम्युनिटी क्लिनिक्सची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे या संकल्पनेचा अधिकाधिक विस्तार झाल्यास आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ होऊ शकते असा विश्वास वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर राहुल घुले यांनी व्यक्त केला आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट