Breaking News
8 ऑगस्टपासून अर्ज नोंदणी सुरू; 13 सप्टेंबरला निकाल
मुंबई : मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईतील तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीच्या अर्ज नोंदणीला 8 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तर, सोडत 13 सप्टेंबरला पार पडणार आहे. ही घरे 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत.
म्हाडाने बांधलेल्या 1327 घरांसोबत कास नियंत्रण नियमावली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डर्सकडून मिळालेली 370 घरं आणि पूर्वीच्या लॉटरीत विविध ठिकाणी उरलेल्या 333 घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांच्या किमती 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. या घरांच्या विक्रीतून तब्बल 2100 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहेत. घरांची संगणकीय सोडत ऐन गणेशोत्सवात म्हणजेच 13 सप्टेंबरला पार पडणार आहे.
म्हाडा लॉटरीचं सविस्तर वेळापत्रक काय?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai