Breaking News
नवी मुंबई ः शहरातील वर्दळीच्या जागा तसेच काहीशा दुर्लक्षित जागांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेले आहेत. त्यानुसार नियमित स्वच्छतेप्रमाणेच विशेष सखोल स्वच्छता मोहीमा राबवून वर्दळीच्या ठिकाणांची साफसफाई केली जात असून त्यामध्ये लोकसहभाग घेण्यावर भर दिला जात आहे.
या अनुषंगाने तुर्भे विभागात कोपरी तलाव येथे जलाशय व परिसर स्वच्छतेची विशेष मोहीम सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम इंदिरानगर व तुर्भे स्टोअर परिसरात राबवून तेथील शौचालये व परिसराच्या सखोल स्वच्छतेच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली. यामध्ये जेटींग मशीनचाही वापर करण्यात आला. कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फतही कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशन्सवरील शौचालयांची सखोल स्वच्छता मोहीम तेथील केअरटेकर व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने राबविली. याशिवाय सेक्टर 19 पेट्रोल पंप आणि सेक्टर 11 कलश उद्यान सोसायटी परिसर येथेही सखोल स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. येथे पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाप्रमाणेच सोसायटीमधील नागरिकांनीही उत्साही सहभाग घेतला.
ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी अशोक अहिरे व उप मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली रेल्वे स्टेशन परिसर आणि तेथील शौचालये यांची सखोल स्वच्छता करून घेण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 5 येथील पेट्रोल पंप व सेक्टर 4 येथे वॉच टॉवर परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम नागरिक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आली.
घणसोली मध्येही सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी संजय तायडे यांनी स्वच्छता अधिकारी विजय पडघन आणि विभाग कार्यालयातील सहकारी कर्मचारी व स्वच्छतामित्रांसह रबाले पेट्रोल पंप येथे सखोल स्वच्छता मोहीम राबविली. तेथील शौचालय सर्व नागरिकांच्या वापरासाठी खुले ठेवण्याच्या व ते नियमित स्वच्छ राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे घणसोली सेक्टर 3 मार्केट येथील दुकानांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक व्यापक जनजागृती करण्यात आली. यावेळी व्यावसायिक आणि नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळण्याविषयी आवाहन करण्यात आले तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. नेरूळ विभागातही जुईनगर पेट्रोल पंप परिसर व त्या ठिकाणचे शौचालय स्वच्छतेची मोहीम राबविली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai