Breaking News
31 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2024-25 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर 527 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 पोटकलम (1) (2) (3) (4) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करून घेणे अनिवार्य असून त्याचा अहवाल 31 मार्च 2025 पर्यंत पाठवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होउुन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे. याप्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था / मालक / भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25,000 अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 398 (अ) खाली अंतर्भूत करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण दिनांक 31.03.2025 पूव पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे.
धोकादायक झालेल्या इमारतींचा/घरांचा वापर केल्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा/घराचा रहिवास/वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील याची नोंद घेण्यात यावी.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai