Breaking News
नवी मुंबई : कोकण विभागीय माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांना शासनाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) या पदावर पदोन्नती दिली आहे. या पदोन्नतीबद्दल त्यांचे कोकण विभागातील अधिकारी व विभागातील पत्रकारांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. गणेश मुळे हे 1995 पासून शासन सेवेत वर्ग-1 अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नवी दिल्लीसह धुळे, जळगांव, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांसह गोवा व मंत्रालय मुंबई येथे विविध पदांवर काम केले आहे. 2012 पासून ते कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) या पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी त्यांच्या पदोन्नतीचे आदेश शासनाने जारी केले आहेत.
शासन सेवेत दाखल होण्यापूव त्यांनी सात वर्षे पुर्णवेळ पत्रकार आणि प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. पत्रकारिता, पर्यावरण, ग्रामीण विकास, आदिवासी विभाग, माहिती तंत्रज्ञान या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास असून नवमाध्यमाचे अभ्यासक सल्लागार म्हणून त्यांची ओळख आहे. शासनाच्या महान्यूज न्यूज पोर्टलचे पहिले संपादक म्हणून देखील त्यांनी कार्य बजावले आहे. त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध पुरस्काराने डॉ. गणेश मुळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai