Breaking News
नवी मुंबई ः पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 104 वर्षापूव रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात आणि ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा एक चित्रपट निर्माण करून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘कर्मवीरायण’ या चित्रपटाची निर्मिती ट्रान्स एफेक्स स्टुडिओ कडून करण्यात आली. या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग मॉरीशस येथील महात्मा गांधी इंस्टीट्यूट मध्ये दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पार पडले.
अज्ञानाच्या अंध:कारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 104 वर्षापूव रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात आणि ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. त्यांच्या या शैक्षणिक कार्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली. या विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वामधूनच आज महाराष्ट्राला संपूर्ण देशात प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. या संपूर्ण प्रगतीस कर्मवीरांचे शैक्षणिक कार्यच कारणीभूत आहे. असे म्हटले तर वावगे ठरत नाही. त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा एक चित्रपट निर्माण करून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘कर्मवीरायण’ या चित्रपटाची निर्मिती ट्रान्स एफेक्स स्टुडिओकडून करण्यात आली. या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग मॉरीशस येथील महात्मा गांधी इंस्टीट्यूट मध्ये दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पार पडले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन कार्य आणि संघर्ष आपल्या देशाबाहेरील प्रेक्षक वर्गाला देखील समजावा तसेच महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडण घडणीमध्ये कर्मवीरांचे उत्तुंग योगदान आहे, महापुरुषावरील चित्रपट पाहून नक्कीच प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास धनंजय भावलेकर यांनी व्यक्त केला, आज रयत शिक्षण संस्थेचे अनेक विद्याथ परदेशात आहेत, त्यांनी हा चित्रपट पाहावा आणि आपल्या घरातील पुढील पिढीला देखील कर्मवीर अण्णा विषयी सांगावे असे त्यांनी आवाहन केले.
या स्क्रीनिंग साठी मॉरीशस मधील ज्येष्ठ नागरिक संघ, मराठी स्पीकिंग यूनियन, प्राध्यापक शिक्षक वर्ग, विद्याथ, मराठी ट्रस्ट अश्या मॉरीशस मधील विविध क्षेत्रातील प्रेक्षकांची आणि विद्याथ वर्गाची उपस्थिती होती. डॉ. व्ही. कुंजल, संचालक महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस, डॉ. एम. कुंजल माजी विभाग प्रमुख एम जी आय, डॉ. होमराजन उपाध्यक्ष मराठी साहित्य परिषद मॉरिशस, भालचंद्र गोविंद जगताप , अध्यक्ष मराठी साहित्य परिषद मॉरिशस, नितीन बापू , अध्यक्ष भवानी मंदिर आणि विद्याथ वर्ग उपस्थिती लावली होती. आभार आणि मराठी विभागच्या प्रमुख निशी हिरूलक्ष्मण यांनी आभार आणि सूत्रसंचालन केले. चित्रपटाच्या संशोधन समितीचे प्रमुख महावीर जोंधळे, लेखिका इंदुमती जोंधळे, पटकथा लेखक अनिल सपकाळ, क्रिएटिव हेड सावनी वि, माजी मुख्याध्यापिका विनीता नगरकर आणि दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांची उपस्थिती होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai