Breaking News
ग्लॉबोकॅन 2020 च्या अहवाला नुसार 1.8 दशलक्ष रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी
नवी मुंबई : देशात सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. वाढत्या फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी कर्करोगावर प्रभावीपणे उपचार देणाऱ्या अपोलो कर्करोग केंद्रात आता देशातील पहिला लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु झाला आहे.
सध्या देशात आढळून येणाऱ्या एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी 5.9 रुग्णांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले आहे. तर देशात कर्करोगाच्या विळख्यामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी 8.1 टक्के रुग्णांच्या मृत्यूला फुफ्फुसाचा कर्करोग कारणीभूत ठरला आहे. ही भयावह आकडेवारी ध्यानात घेत अपोलो कर्करोग केंद्राने जीवघेण्या फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु करण्याचे निश्चित केले. फुफ्फुसाच्या आजाराचे वेळीच निदान व्हायले हवे. वेळेवर या कर्करोगाचे निदान झाले तर रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होते. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी)च्या पुढाकाराने ग्लॉबोकॅन 2020 च्या अहवालात कर्करोगाच्या नोंदी आणि मृत्यूबाबत संशोधन करण्यात आले. या अहवालानुसार 2020 साली 1.8 दशलक्ष (18टक्के) रुग्णांचा फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.
50 ते 80 वयोगटातील रुग्ण, कर्करोगाचे कोणतेही लक्षण न दिसून येणारे रुग्ण तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांचे कुटुंबीय या सर्व वर्गवारीतील रुग्णांच्या वेळीच निदानासाठी तत्परतेने तपासणी करता यावी म्हणून लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. फुफ्फुसाचा कर्करोगाच्या निदानासाठी अत्यल्प प्रमाणातील कॉम्प्युटेड टोमोग्राफी तपासणी केली जाते. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्वरित उपचार सुरु करता येतात. जेणेकरुन रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता दुणावते. दुर्दैवाने, फुफ्फुसाचा कर्करोग बळकावण्याची 80 टक्के उच्च जोखीमेच्या रुग्ण त्यांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना शरीरातील लक्षणांबाबत, व्यसने तसेच घरातील सदस्यांना झालेल्या फुफ्फुसाच्या कर्करोग याबाबतीत पुसटशीही कल्पना देत नाही. वाढत्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या केसेस ध्यानात घेत याबाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि तपासणीबद्दल माहिती उपलब्ध व्हायला हवी. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले तर उच्च जोखीमेच्या रुग्णांना वाचवणेही शक्य आहे.
डॉ जयलक्ष्मी टी के, सिनियर कन्सल्टन्ट पल्मोनॉलॉजी,अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाल्या, अपोलो कॅन्सर सेंटरच्या लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्रामची सुरुवात भारतामध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये चिंताजनक वाढीवरील उपायांच्या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सर्वसमावेशक स्क्रीनिंग प्रोग्रामसह आम्ही आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यामुळे प्रभावी उपचार आणि रिकव्हरीची शक्यता खूप जास्त असते. डॉ पवनकुमार बिरारीस, कन्सल्टन्ट पल्मोनॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले, आमच्या लंग-लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राममार्फत, लो-डोस सीटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जास्त धोका असलेल्या लोकांना लवकरात लवकर ओळखणे आमचे उद्दिष्ट आहे. डॉ ज्योती बाजपेयी, लीड - मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई, यांनी सांगितले,“आम्ही भारतामध्ये पहिला लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम सुरु केला ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai