55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2024
- 594
आंदोलन सुरुच ; नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर चर्चा होण्याची अपेक्षा
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आपल्या जमिनी व घरे देणाऱ्या भुमिपुत्रांच्या अनेक मागण्या अपुर्ण आहेत. वारंवार आंदोलन अर्ज, चर्चा करूनही नवी मुंबई विमानतळ बाधितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने 7 ऑक्टोबरपासून प्रकल्पग्रस्तांनी सिडको कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला 55 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र त्यानंतरही आंदोलन सुरू असून नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर चर्चा होण्याची अपेक्षा भूमिपुत्रांना आहे.
नवी मुंबई विमानतळ पूर्णत्वास जात आहे. येत्या एप्रिल 2025 पर्यंत ते कार्यान्वित होणार आहे. मात्र या विमानतळासाठी आपले सर्वस्व असलेल्या जमिनी आणि राहती घरे देणाऱ्या भूमिपुत्रांचे पुनर्वसन अपूर्ण आहे. यासंदर्भात 1 जुलैला पनवेल ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मार्च काढला होता. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने 7 ऑक्टोबरपासून प्रकल्पबाधितांनी आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागणीसाठी हे प्रकल्पग्रस्त गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने लढत आहेत. तरीही राज्य सरकार सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे पूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत योग्य पुनर्वसनाच्या मागणीसाठी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ समिती आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाला जनतेकडून जाहीर पाठिंबा मिळत आहे. विमानतळ समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, विशाल भोईर, किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर, चांगुणा डाकी, किरण केणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
- नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या.
- बाधित झालेल्या मच्छीमारांना 2013 च्या भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा लागू करा.
- विमानतळबाधित दहा गावांतील 18 वर्षांवरील सर्व तरुणांना विमानतळ प्रकल्पात सामावून घेणारे रोजगार प्रशिक्षण द्या वाघिवली गावातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे त्वरित वाटप करा.
- गावातील ज्या प्रकल्पग्रस्तांची घरे हटविण्यात आली आहेत त्यांना भूखंड द्या. त्याचप्रमाणे त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बाजार दरानुसार घरभाडे द्या.
- ज्यांची घरे सिडकोने तोडली आहेत, त्यांना 1,500 बांधकाम खर्च द्या, तसेच 18 महिन्यांसाठी देण्यात आलेल्या भाडे कालावधीला मुदतवाढ द्या.
- चिंचपाडा तलावपाली भागातील बाधितांना पूर्ण भूखंड आणि पॅकेज द्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai