Breaking News
नवी मुंबई : मधुमेहामध्ये रक्ताभिसरणातील अडथळे, नसांचे नुकसान आणि तब्येतीत सुधारणा होण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पायांमध्ये मोठी गुंतागुंत होऊ शकते. संसर्ग झाल्यामुळे काही केसेसमध्ये पाय कापावा देखील लागू शकतो. हे टाळण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने एक अत्याधुनिक डायबेटिक फूट क्लिनिक सुरु केले आहे. नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय मधुमेह महिन्याचे औचित्य साधून या क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले.
भारतात दर चौथ्या व्यक्तीला मधुमेह आहे, मधुमेह असलेल्या जवळपास 12 ते 25% लोकांना डायबेटिक फूट अल्सर होण्याची शक्यता असते. डायबेटिक फूट असलेल्यांपैकी जवळपास 15 ते 18% व्यक्ती आपले पाय गमावतात. योग्य उपचारांविषयी जागरूकतेची कमतरता हे पाय काढावा लागण्याचे एक प्रमुख कारण आहे. याचे प्रमाण लक्षणीय वेगाने वाढत आहे. हे टाळण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय मधुमेह महिन्याचे औचित्य साधून एक अत्याधुनिक डायबेटिक फूट क्लिनिक सुरु केले आहे. याठिकाणी मधुमेही रुग्णांना सुयोग्य देखभाल पुरवली जाते. डायबेटिक फूट क्लिनिक हे अशा प्रकारचे पहिलेच क्लिनिक आहे. याठिकाणी प्रतिबंधात्मक देखभाल पुरवली जाईल, डायबेटिक फूट समस्यांशी संबंधित धोक्यांचे व्यवस्थापन आणि ते धोके कमी करण्यासाठीच्या प्रगत उपचार धोरणांसह आजार लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी मदत केली जाईल. एन्डोक्रिनॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, डायबेटिक फूट स्पेशालिस्ट आणि जखमेची देखभाल करणारे तज्ञ एकमेकांच्या समन्वयाने व्यक्तिगत देखभाल योजना पुरवतील. या व्यक्तिगत देखभाल योजना प्रत्येक रुग्णाच्या गरजांनुसार तयार केलेल्या असतील, त्यामुळे गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका कमी केला जाईल आणि रुग्णाला सर्व आवश्यक हालचाली व्यवस्थित करता याव्यात, उत्तम आयुष्य जगता यावे यासाठी साहाय्य पुरवले जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai