पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2024
- 492
कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका संपणार
पनवेल : कामकाजाला वेग देण्यासाठी पनवेल महापालिकेत ई-ऑफिस सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. या सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण बुधवारी (27 नोव्हेंबर) महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आणि उपस्थितीत देण्यात आले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एनआयसी सेंटरच्या अधिकाऱ्यांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे येत्या 10 दिवसांत पालिकेचा कारभार पेपरलेस होणार असून कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका संपणार आहे.
सरकारी कामकाज गतिमान करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली असून उपायुक्त कैलास गावडे यांनी प्रस्तावनेत या सॉफ्टवेअरचे स्वरुप आणि महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्य सरकारने ई-ऑफिस सॉफ्टवेअर विनामूल्य दिले असून एनआयसी संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत ही प्रणाली राबवली जात आहे. एनआयसी संस्थेच्या प्रकल्प समन्वयक लक्ष्मीकांत गर्जे आणि सुरेश सुरा यांनी यावेळी ई-ऑफिस प्रणालीमधील विविध घटक त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली. कार्यालयात चालणारे कागदोपत्री कामकाज सोपे आणि वेगाने व्हावे यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांनी ई-ऑफिस साफ्टवेअर महापालिकेत सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केला होता. आता 10 दिवसांत पनवेल महापालिकेत ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरू होईल.
यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा प्रशिक्षक नीलेश नलावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय कटेकर, लेखा अधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे शिवाय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ई-ऑफिस सॉफ्टवेअरचे फायदे
- पेपरलेस कामकाज
- कामाचा वेग वाढेल
- कामात पारदर्शकता येईल
- कागदपत्रांची शोधाशोध थांबेल
- कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका संपेल
- कुठूनही काम करणे सोपे होणार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai