Breaking News
नवी मुंबई : बेलापूर गावात राहणाऱ्या एका आदेश हरी कोळी याने जमिन मालकासोबत कोणताही विकास करारनामा झाला नसताना पुष्पक नगर मध्ये इमारती बांधुन त्यातील फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने 27 व्यक्तींकडुन तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये उकळून त्यांना फ्लॅट अथवा त्यांची रक्कम त्यांना परत न करता, फसवणुक करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकणातील फरार आरोपी आदेश कोळी हा बेलापूर गावात राहण्यास असून त्याने जानेवारी 2020 मध्ये बेलापूर गावामध्ये मे. भुमी एन्टरप्रायझेस नावाने कार्यालय थाटले होते. तसेच त्या माध्यमातून त्याने प्रॉपर्टी खरेदी विक्री करणे व फ्लॅट भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्यावेळी आदेश कोळी याने उलवेतील पुष्पक नगर सेक्टर-25 मधील भुखंड क्र.516 चे मालक अनिल परदेशी यांच्यासोबत भुखंड विकासित करण्याचा करारनामा झाल्याचे भासवून त्या इमारतीतील फ्लॅटची बुकींग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी आदेश कोळी याने लवकर फ्लॅटची बुकींग केल्यास त्यांना कमी किमतीत किफायतशीर दरामध्ये चांगला फ्लॅट मिळेल, असे आमिष दाखवले होते. सदर ठिकाणी इमारतीच्या बांधकामाची पूर्व परवानगी (सीसी) मिळण्याकरीता सिडकोकडे अर्ज केल्याचे सांगून लोकांना आकर्षित केले होते. आदेश कोळी याच्या या भुलथापांना बळी पडून अनेक लोकांनी त्याच्याकडे 1 लाखापासून ते 28 लाखांपर्यंत रक्कम जमा करुन फ्लॅटची बुकींग केली. त्यावेळी आदेशने सर्व बुकींगधारकांसोबत नोटरी करारनामा करुन पुढील 3 वर्षात फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. पुष्पक नगरमधील भुखंडावर फुटींगचे काम सुरु असल्याचे सुरुवातीला काही बुकींगधारकांना निदर्शनास आले होते. मात्र नंतर त्याठिकाणी काम बंद असल्याचे आढळुन आले. त्यामुळे बेलापूर गावातील अनिल टोळे याने नोव्हेंबर 2021 मध्ये फ्लॅटची बुकींग रद्द करुन आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी आदेश कोळी याने लवकरच बांधकाम सुरु होईल असे आश्वासन देऊन वेळ मारुन नेली. त्यानंतर आदेश कोळी याने बेलापूर गावातील आपले कार्यालय व मोबाईल फोन बंद करुन पलायन केले. अनिल टोळे याने एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आदेश कोळी याने विकास करारनामा झालेला नसताना 27 लोकांकडुन तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये उकळुन पलायन केल्याचे आढळुन आले. एनआरआय पोलिसांनी आदेश कोळी याच्या विरोधात फसवणुकीसह अपहार तसेच महाराष्ट्र मालकी फ्लॅट
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai