Breaking News
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफ्युजन-फ्री प्रक्रिया आशेचा नवा किरण
नवी मुंबई : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने मल्टिपल मायलोमा झालेल्या एका 57 वर्षाच्या रुग्णावर ब्लडलेस किंवा ट्रान्सफ्युजन-फ्री, ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट यशस्वी झाल्याची घोषणा केली. ही ऐतिहासिक प्रक्रिया रुग्ण-केंद्रित देखभालीमधील लक्षणीय प्रगती दर्शवते. मेडिकल स्थिती, धार्मिक विश्वास किंवा व्यक्तिगत प्राथमिकतांमुळे ज्या व्यक्ती पारंपरिक ब्लड-ट्रान्सफ्युजन करवून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी एक नवा आशेचा किरण आहे.
नवी मुंबईचे रहिवासी, बबन शिंदे यांना क्वाड्रिपॅरेसिस म्हणजे चारही अवयवांमध्ये कमजोरीचा त्रास होता. तपासणीमध्ये समजले की त्यांना मल्टिपल मायलोमा म्हणजे एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर आहे. या रक्ताच्या कॅन्सरमध्ये बोन मॅरोमध्ये प्लाझ्मा पेशी कॅन्सरग्रस्त होतात आणि अनेक पटींनी वेगाने वाढू लागतात. मल्टिपल मायलोमा खेरीज, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हायपर ट्रायग्लिसराइडेमिया, फक्न्शनल आर्यनची कमतरता, बी 12 जीवनसत्त्व अगदी सीमारेषेवर असणे, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेमध्ये कमतरता आणि किडनीचा आजार अशी अनेक आव्हाने झेलावी लागत होती. त्यांच्या मेडिकल स्थितीमधील गुंतागुंत पाहता, पारंपरिक ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये खूप धोका होता. ही सर्व आव्हाने लक्षात घेऊन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट (बीएमटी) आणि सेल्युलर थेरपी (सीएआर-टी) मधील तज्ञ कन्सल्टन्ट हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ कुणाल गोयल यांनी एक अत्याधुनिक दृष्टीकोन अवलंबिण्याचा निर्णय घेतला आणि ब्लडलेस किंवा ट्रान्सफ्युजन-फ्री ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट केले. डॉ कुणाल गोयल यांनी सांगितले, ‘ब्लडलेस एएससीटी (ऑटोलॉगस ट्रान्सप्लान्ट) हा एक अभिनव मेडिकल दृष्टीकोन आहे. सर्जिकल प्रक्रियेदरम्यान ब्लड प्रोडक्ट ट्रान्सफ्युजनची आवश्यकता कमी करणे किंवा पूर्णपणे संपवणे हा यामागचा उद्देश आहे. जेहोवा विटनेसेससारख्या धार्मिक मान्यता, व्यक्तिगत प्राथमिकता किंवा बबन शिंदेंच्या केसप्रमाणे जोखीम किंवा मेडिकल स्थितीमुळे ट्रान्सफ्युजन करवून घेण्यात असमर्थ असलेल्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया फायदेशीर आहे.
शिंदेंच्या केसमध्ये अशी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली ज्यामुळे ट्रान्सफ्युजन-फ्री प्रक्रिया यशस्वी झाली. रुग्णाच्या बोन मॅरोला स्टेम सेलच्या स्त्रोताच्या रूपामध्ये उपयोगात आणले गेले, ज्यामुळे पेरिफेरल ब्लड स्टेम सेल कलेक्शनच्या तुलनेत ब्लड ट्रान्सफ्युजनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले. लाल रक्तपेशी निर्माण करण्याची शरीराची नैसर्गिक क्षमता वाढवण्यासाठी लोहाचा स्तर अनुकूलित करण्यात आला आणि ट्रान्सफ्युजन न करता ऍनिमियावर उपचार करण्यासाठी बोन मॅरो उत्तेजित करण्यासाठी एरिथ्रोपोएसिस-स्टिम्युलेटिंग एजंटचा उपयोग केला गेला. प्लेटलेट फंक्शन आणि काउन्ट सुरक्षित ठेवण्यासाठी औषध दिले गेले, ज्यामुळे रक्तस्रावाचा धोका कमी केला गेला. प्रक्रियेदरम्यान रक्ताचे नुकसान कमी करण्यासाठी अतिशय सावधानी बाळगून सर्जिकल तंत्र आणि रक्त संरक्षण पद्धतींचा उपयोग केला गेला. संसर्ग आणि संभाव्य गुंतागुंतींसाठी लक्षणांवर संपूर्ण लक्ष ठेवले गेले. रुग्णाला सकारात्मक परिणाम मिळाले आणि स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट यशस्वी झाले. बबन शिंदे यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता न भासता, रिकव्हरीनंतर घरी पाठवले गेले. त्यांची तब्येत आता ठीक आहे आणि ते आपल्या कुटुंबियांसोबत आणि काम करत सामान्य आयुष्य जगत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai