Breaking News
घारापुरी ते करंजा जेट्टी 18 किलोमीटरचा प्रवास 5 तास 29 मिनिटात केले पार
उरण ः करंजा येथील सुपुत्र प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे (वय 11)याने मंगळवार, 3 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1:04 मिनिटाने प्रसिद्ध घारापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान देत रात्रभर सतत पोहत सकाळी 7 वाजण्याच्या अगोदरच करंजा जेट्टी येथे पोहोचला. उरण तालुक्यातील घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी 18 किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत पुन्हा एकदा नवा इतिहास घडवीला आहे.
गेल्यावष मयंकने 3 डिसेंबर 2023 रोजी धरमतर ते करंजा जेट्टी हा प्रवाह (चॅनेल)पोहून पार केला. तेव्हाही त्याने विक्रम केला होता. धरमतर ते करंजा जेट्टी व घारापुरी ते करंजा जेट्टी पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिलाच व एकमेव जलतरणपटू आहे. हे दोन्ही प्रवाह सर्वप्रथम पोहण्याचे नवीन विक्रम मयंक म्हात्रे याच्या नावावर आहेत. त्यामुळे मयंक म्हात्रे याचे नाव या चॅनेल वर प्रथम जलतरणपटू म्हणून कायमचे कोरले गेले आहे. 11 वषय मयंक म्हात्रे हा सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण येथे शिकत असून कोंढरीपाडा करंजा येथे तो वास्तव्यास आहे. दररोज 5-5 तास तो पोहण्याचा सराव करत असे. त्यातून सर्वांच्या मार्गदर्शनामुळे 3 डिसेंबर 2024 रोजी उरण तालुक्यातील घारापुरी ते करंजा जेट्टी हा समूद्रातील प्रवाह पोहून त्यांनी नवा विक्रम केला आहे. घारापुरी ते करंजा हे अंतर सहा तासाच्या आत पूर्ण अपेक्षित होते मात्र मयंकने ते अंतर पाच तास 29 मिनिटात पूर्ण केले.
मयंक म्हात्रे करंजा जेट्टी येथे सकाळी पोहोचताच करंजाचे ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी त्याचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले. करंजा जेट्टी येथे मयंक म्हात्रे याचा छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मयंक म्हात्रे याला सुरवातीपासून त्याचे आई वीणा दिनेश म्हात्रे व वडील दिनेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. मयंकच्या या ऐतिहासिक कामगिरीस प्रशिक्षक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनिल पाटील, प्रशिक्षक मनोहर टेमकर, जलतरण पटू आर्यन मोडखरकर, जयदीप सिंग, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील आदींचे सहकार्य या विक्रमादरम्यान लाभले आहे. मयंक म्हात्रे याच्या आजपर्यंतच्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड स्पर्धेसाठी सेंटमेरी स्कुलच्या माध्यमातून राज्यस्तरावर झाली आहे. उरण नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा, मुंबई जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे वर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai