Breaking News
नवी मुंबई ः कोकण विभागीय बैठकीमध्ये नवी मुंबई सहकार भारती त्याचप्रमाणे कोकण विभागातील सर्व जिल्हे आणि महानगरे यांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी नवी मुंबई सहकार भारतीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रमोद जोशी यांची नियुक्ती करण्यातआली आहे.
प्रदेश महामंत्री विवेक जी जुगादे यांनी नवी मुंबई सहकार भारतीच्या कार्यकारिणीची घोषणा केली. प्रमोद जोशी यांनी नवी मुंबईत केलेल्या उत्कृष्ट कामासाठी पुनश्च अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर संतोष मिसाळ महामंत्री व उपाध्यक्षपदी ॲड साक्षी वेखंडे, श्रीराम घाटे, ॲड चंद्रकांत निकम, ॲड श्रीकांत चव्हाण, सचिव पदी उदयकुमार तांदळे महिला अध्यक्षपदी संगीता बांगर, संघटन प्रमुख रश्मी सकपाळ, पतपेढी प्रकोष्ट सुनील सावंत पतपेढी प्रकोष्ट, विज्ञान म्हात्रे, मोहन मुकादम तसेच नवी मुंबईतील सर्व प्रकारचे प्रमुख सहप्रमुख अशी मिळून 40 जणांची जम्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली. सदर बैठकीसाठी प्रदेश महामंत्री विवेक जी जुगादे, प्रदेश सह संघटन प्रमुख प्रवीण जी बुलाख, ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णुजी बोबडे त्यांची उपस्थिती होती.
कार्यकारणीची घोषणा झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद जोशी यांनी नवी मुंबईतील प्रलंबित असलेल्या सिडको ट्रान्सफर चार्जेस आंदोलनाचा विषय त्याचप्रमाणे नवी मुंबई सहकार भवन बांधण्याविषयीचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडला. प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी कार्यकर्त्यांनी सहकार भारतीचे काम करत असताना कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कामाची दिशा कशी असली पाहिजे कार्य करत असताना संघटनेचे हित याला सर्वत्र प्राधान्य दिले पाहिजे. त्याचप्रमाणे भविष्य काळात सहकार भारतीचा दबदबा सर्व नवी मुंबई त्याचप्रमाणे राज्यात पसरला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. प्रदेश सह संघटन प्रमुख प्रवीण जी बुलाख यांनी आगामी काळात सहकार भारतीचे कार्यक्रम त्याचप्रमाणे सहकार भारतीच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी करावयाचा उपायांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण विभाग सह संघटन प्रमुख कृष्णकांत निमसे त्याचप्रमाणे विना मोकाशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभाग प्रमुख राजू ठाणगे यांनी केले. समापण मंत्रा नंतर बैठकीची सांगता झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai