Breaking News
पालिकेच्या दव्युत्तर पदवी वैदयकीय शिक्षण संस्थेचा शैक्षणिक प्रारंभ
नवी मुंबई ः महानगरपालिकेचे स्वत:चे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था सुरु करण्यास केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या प्राप्त होउुन सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात यांचीही परवानगी प्राप्त झाली होती. त्यास अनुसरुन राज्य विभागातर्फे स्त्री रोग वभागात पहिला विद्यार्थी दाखल झाला असून या माध्यमातून पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्थेचा शैक्षणिक प्रारंभ झालेला आहे. उर्वरित विद्यार्थी यापुढील प्रवेश प्रक्रियेत दाखल होउुन हे महाविद्यालय संपूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे महानगरपालिकेस शक्य होणार असून महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्थेस पहिल्या टप्प्यात ‘मेडिसीन (3 सीट्स)’, ‘ऑर्थोपॅडीक (2 सीट्स), ‘गायनॅकोलॉजी (8 सीट्स) व ‘पिडीयाट्रीक (4 सीट्स)’ अशा 4 शाखांमध्ये 17 जागांची परवानगी प्राप्त झाली होती. आता विशेष म्हणजे 4 शाखांमध्ये आणखी भर घालत पाचव्या सर्जरी शाखेकरिताही परवानगी प्राप्त झालेली असून सर्जरी शाखेत 4 जागांकरिता परवानगी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मेडीसीन विभागात उर्वरित एका जागेचीही परवानगी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मेडीसीन विभागासाठी आधीच्या 3 अधिक नव्याने परवानगी मिळालेली 1 अशा एकूण 4 जागांची परवानगी प्राप्त झालेली आहे. म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेने मागणी केलेल्या सर्वच्या सर्व पाचही शाखांकरिता 22 जागांसाठी परवानगी प्राप्त झालेली आहे. पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे.
या संस्थेमध्ये एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होणार आहे. याव्दारे महापालिका रूग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार आहे व नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai