Breaking News
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असून, जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू या 42 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका इथे झाले. यावेळी गडकरी यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान गुरुवारी झालेल्या भूमिपूजनामुळे कामाला गती येईल असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. मुंबई-गोवा महामार्गाचं काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी मुंबई - गोवा महामार्गाचं काम 9 महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे गडकरींनी म्हटले. तसेच कामं न केल्यास, कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. गोवा महामार्गाबाबतीत मी दुःखी आहे. 10 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. या रस्त्याच्या कामानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होईल, असे गडकरी म्हणाले.
पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न राहिल, असे गडकरी म्हणाले. रस्त्यावर 6- 8 इंच टॉपिंग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. चारपदरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच अपघात निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन ब्लॅक स्पॉट, अपघातस्थळची पाहणी करावी, असे सूचविण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी केली. चिपळूणच्या परशुराम घाटाची देखील नितीन त्यांनी पाहणी केली. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही गडकरींनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai