अखेर ठरलं!
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2024
- 660
उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार; भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार
मुंबई ः महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या, 15 डिसेंबरला शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेतील. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबईऐवजी आता नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडून आणत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महायुतीत सर्वाधिक मंत्रीपदं भाजपच्या वाट्याला येणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती. मात्र, आता लवकरच खातेवाटप होणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात रविवारी दुपारी 3.00 वाजता होणार असल्याचे समजते.
राज्यातील फडणवीस सरकारचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवनऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांची चर्चा झाली. तर, अजित पवार हेही दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे,मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण होऊन आता नावांची यादी लवकरच समोर येईल. शिदेंना गृह खाते देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिल्याने हे खाते भाजपकडेच राहणार आहे. पीडब्ल्यूडी आणि नगरविकास खाते शिंदेच्या वाटेला येणार असून राष्ट्रवादीला अर्थखाते मिळू शकते. मात्र नक्की कोणाले कोणते खाते जाते हे शपथविधी झाल्यावरच स्पष्ट होणारआहे.
- कोणाला किती मंत्रिपदे?
भाजपला मुख्यमंत्र्यांसह 21 मंत्रिपदे मिळतील. त्यात पाच राज्यमंत्री असतील. शिंदेसेनेला 12 मंत्रिपदे मिळतील, त्यातील तिघे राज्यमंत्री असतील. अजित पवार गटाला दहा मंत्रिपदे मिळतील, त्यातील दोघे राज्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच आधी ज्या पक्षांकडे जी खाती होती तिच खाती याहीवेळी मिळतील असेही बोलले जात आहे.
- शिंदेसेनेला कोणते खाते?
212 ऐवजी 13 मंत्रिपदे मिळावीत किंवा 12 मंत्रिपदे देणार असाल तर मग गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, जलसंपदा, या चारपैकी एक महत्त्वाचे खाते आम्हाला द्या, असा आग्रह शिंदेसेनेने धरला आहे, असेही समजते. नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण ही खाती शिंदेसेनेकडे राहतील. विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतिपद शिंदेसेनेला दिले जाईल, अशीही शक्यता आहे.
- राष्ट्रवादीकडे कोणती खाती?
3वित्त, सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषधी प्रशासन, क्रीडा व युवक कल्याण, मदत व पुनर्वसन, अशी खाती राहण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai