Breaking News
बारावीचा निकाल 87.33 टक्के तर 10 वीचा 93.12 टक्के
मुंबई ः सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची टक्केवारी 84.67 टक्के आहे.
मागील वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67% मुले उत्तीर्ण झाली आहे. गेल्या वर्षी 94 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ 90.68 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे.
राज्यनिहाय निकालामध्ये यंदा त्रिवेंद्रम (केरळ) 99.91 टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. तर बंगळुरु (कर्नाटक) आणि चेन्नई (तामिळनाडू) अनुक्रमे 98.64%, 97.40% सह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्ली पश्चिम (93.24%) चौथ्या आणि चंदीगड (91.84%) पाचव्या क्रमांकावर आहेत.
दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 1.28 टक्क्यांनी निकाल घसरला आहे. दहावी परीक्षेच्या निकालातही केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्याने (99.91 टक्के) अव्वल स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राचा निकाल 96.92 टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीतही मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.25 आणि मुलांचं 92.27 इतकं आहे. मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 1.98 टक्के जास्त आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai