Breaking News
न्यायालयाच्या निर्णयाने संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा
मुंबई ः मोदी आडनाव बदनामीच्या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेस स्थगिती न देण्याचा निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने अपिल फेटाळताना पूर्णतः विचार केला नसल्याचे मत नोंदवत त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेस स्थगिती देण्याची विनंती केली होती. गुजरात उच्च न्यायालयाने गांधी यांच्यावर अशाप्रकारच्या मानहानीचे अनेक खटले प्रलंबित असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळली होती. या निर्णयास गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर (पान 7 वर)
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यावेळी राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे अशीही समज सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला तर दुसऱ्या बाजूने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai