Breaking News
मुंबई : महारेरामार्फत नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणी देण्यासाठी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये 645 आणि 13 नोव्हेंबरपर्यंत 178 असे मिळून 823 प्रकल्पांना महारेरा नोंदणी मंजूर झाली आहे. त्यात मुंबई महानगराचा समावेश असलेल्या कोकण प्रांताने आघाडी घेतली आहे.
दिवाळीच्या कालावधीत नवीन घरांसाठी नोंदणी, नियोजन मोठ्या प्रमाणात होत असतानाच महारेराने सणासुदीत वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देतानाच योग्य ती माहिती पुरविल्याने ऑक्टोबरमध्ये 645 आणि 13 नोव्हेंबरपर्यंत 178 असे मिळून 823 प्रकल्पांना महारेरा नोंदणी मंजूर झाली आहे. त्यात मुंबई महानगराचा समावेश असलेल्या कोकण प्रांताने आघाडी घेतली आहे. कोकण प्रांतातील 382, पुण्यातील 257, नाशिकमधीनल 57, छत्रपती संभाजीनगर 33, अमरावतीच्या 17 प्रकल्पांचा समावेश आहे. महारेरामार्फत गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 769 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये 1,208 आणि 13 नोव्हेंबरपर्यंत 414 प्रकल्पांनी नोंदणी अर्ज केले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या विकासकांना प्रकल्पांसाठी नोंदणी क्रमांक प्राप्त झालेले नाहीत.
नोंदणीसाठी कोणत्या मंजुरी, कागदपत्रे लागतात त्याविषयी वेबसाइटप्रमाणेच विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांनाही माहिती आहे. यासह विकासकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा संस्थांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी महारेरा मुख्यालयात मार्गदर्शनासाठी येत असतात. या जोडीला महारेराचे अधिकारीही आठवड्यातून एकदा माहिती दिली जाते.
ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील विभागनिहाय अर्ज आणि मंजुरी
ऑक्टोबर
नोव्हेंबर
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai