Breaking News
लोकसभेत अज्ञातांचा धुमाकुळ; प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी, स्मोक कँडल जाळल्या
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना, अज्ञातांनी घुसखोरी करत गोंधळ घातला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. यातल्या एकाच सागर शर्मा तर दुसऱ्याचं नाव मनोरंजन आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची गुप्तचर संस्थांकडून चौकशी सुरू आहे. तर इतर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शन केली. त्यांनी स्मोक कँडलमधून धूर सोडला. यातल्या एकाच नाव अमोल शिंदे असं असून तो लातूरचा रहिवासी आहे, तर तरूणीचं नाव नीलम कौर सिंग असं आहे. ती हिस्सारची रहिवासी आहे.या प्रकारामुळे 22 वर्षांपुर्वी संसदेवर 5 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याच दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी पुन्हा संसदेची सुरक्षा भेदली.
प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे. हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. एका खासदाराने सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितलं की, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरचे कोणीतरी खासदार आहेत त्यांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai