Breaking News
16 आमदार पात्र; ठाकरे गटाला धक्का
मुंबई ः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे जनतेचे लक्ष लागले होते तो निकाल आज विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे त्यांनी नमुद केले. खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं राहुल नार्वेकर म्हणाले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर 16 आमदारांनाही नार्वेकर यांनी पात्र ठरवले असल्याने हा निकाल ठाकरे यांना धक्का देणारा ठरला आहे.
शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची 1999 ची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही असंही ते म्हणाले. शिवसेनेची घटना, त्यात 2018 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काय निकाल दिला तेदेखील मी विचारात घेतलं आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसंच विधिमंडळातलं बहुमत काय आहे? तेदेखील लक्षात घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्यासाठी योगेश कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या सगळ्या निकषांवर खरी शिवसेना कुणाची? निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असतो असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. 2018 ची पदरचना ही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नव्हती. पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असल्याचा दावाही राहुल नार्वेकर यांनी फेटाळला. तसंच कुणालाही पदावरुन काढण्याचा किंवा पक्षातून हकालपट्टीचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी मान्य करता येत नाही. उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य करायचा झाला तर पक्षातल्या कुणालाच त्यांच्याविरोधात बोलता येणार नाही. पक्षप्रमुखाला सगळे अधिकार देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai