Breaking News
नवी मुंबई : मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांनी महानगरपालिकेच्या ठेकेदार व प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व उठाबशा काढण्याची धमकी दिल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे शहरातील प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी आक्रमक भूमिका घेवून मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयावर धडक दिली. पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी संघटनांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सीवूडमध्ये सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. कामाच्या ठिकाणी जावून ठेकेदाराला व मनपाच्या अधिक़ाऱ्यांना धारेवर धरले. ठेकेदार, इंजीनीअर विषयी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी व ठेकेदारांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. गुरूवारी मनसेच्या सीवूड कार्यालयावर धडक देवून या घटनेचा जाब विचारला व निषेध व्यक्त केला. या घटनेचे पडसाद महानगरपालिकेच्या वर्तुळामध्येही उमटले आहेत. अशा प्रकारे पालिकेच्या ठेकेदार, अधिकारी यांना धमकावणे, शिवीगाळ करणे योग्य नाही. या प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिकारी ठेकेदारांना धमकावण्याच्या घटना थांबल्या नाहीत तर काम करणे अशक्य होईल अशी भूमिका घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमधील श्रमिक सेना संघटना, महाराष्ट्र कर्मचारी युनियन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, त्यांना धकमी देणे योग्य नाही. काही आक्षेप असल्यास तो सनदशीर मार्गाने नोंदविणे शक्य आहे. धमकी देणे व शिवीगाळ करण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसीकतेवर परिणाम होतो अशी भुमीका घेतली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai